Monday 30 December 2013

संभ्रम

मृगजळ असते मोहक, सुरेख,
आपल्या दृष्टीतच त्याचे अस्तित्व;
शोधू जाता ठाव ठिकाणा,
उमगते नंतर तो एक संभ्रम ||

आनंद असतो जगण्यात, म्हणतात खरे,
का आपल्या मानण्यात, नकळे;
अनुभवता हे जीवन, बोल येती ओठी,
हा आनंदही एक संभ्रम ||

वादळापूर्वीची शांतता, असते गूढ मूकी,
भयाण असते ती? का बापडी?
क्लिष्ट जिचा अंदाज बांधणे,
ती शांतता ही एक संभ्रम ||

मृगजळापरी हे जगणे, असते मोहक बाह्यस्वरूपे,
भयाणता त्याची, अनुभवल्याविणा न उमगे;
तरीही आपण जगतोच ना, आनंद उपभोगतोच ना,
कारण हे आयुष्यच एक संभ्रम ||

-ॐकार

Link to my English writings. Click here.

Tuesday 1 October 2013

ही माणसे

जगाच्या ह्या पटावरती आहेत अनेक चेहरे।
प्रत्येकाची चाल वेगळी जणू बुध्दीबळातील मोहरे।।

काही असती धूर्त, लबाड; काही सरळ भाबडे।
सूज्ञ असती त्यातील काही, काही निव्वळ वेडे।।

वाद घालती इतरांशी नसता कारण काही।
माणूस आहोत आपण ह्याची जणू त्यांना जाणच नाही।।

मिरवती बिरुदे बौध्दिमत्तेची गर्वाने ह्या भूलोकावरी।
ठेच लागूनही चुकल्यावर कळते ह्यांची हुशारी।।

जेष्ठ वागती कनिष्ठांसारखे करती पोरकटपणा।
हक्काने सांगती कनिष्ठांना माञ, आमच्यासारखे बना

कुरघोडी करती एकमेकांवर, काही खेळती जिवाशी।
विसरून जाती साफ माञ आपण एकाच नावेतील प्रवासी।।

मृगजळापरी ही माणसे कधी कोणा ना उमगणार।
कलियुगातील मानवाचे गूढ ब्रम्हासही ना उकलणार।।

-ॐकार

Link to my English writings. Click here.

Sunday 29 September 2013

मन

ना लगाम ना बांध कसला मन आपले बेफाम |
जिव्हाळ्याचा स्पर्श होता एक नाते होते निर्माण ||

दुखावते हे नाजूक मन |
येता काही दुःखद क्षण ||

बाल्य, तारूण्य, वृध्दत्व असो वा असो कुठलाही काळ |
मन आपले असते विचारांची भन्नाट चाळ ||

साशंकता ही मनात वसते |
त्याने मन हे कायम फसते ||

तारुण्यात येतो ह्याला बहर |
फसवणूकीचा होतो कहर ||

स्मित करता कोणी परके आप्त ते ह्याला वाटे |
खरे आप्त माञ ह्याला परके होऊनी जाते ||

अवश्य करावे परके मन आपले |
पण पहावे जाते का ते नाते जपले ||

प्रेमात पडताना विचार करावा आपल्या मनाचा |
कारण ते तुटायला अवकाश ही नसतो क्षणाचा ||

-ॐकार

Link to my English writings. Click here.

Thursday 29 August 2013

मेघ लिला

कोण जाणे काय आले ह्या घनांच्या मनात ?
कोसळता चार सरी उर्वी सुखावली क्षणात ||

कोपला होता सूर्य नभी लाही होती तनात |
पण शरण आला ह्या घनांपुढे कुढू लागला तो मनात ||

स्वैर गार वारा सुसाट सुटला रानात |
जेव्हा काळे ढग दाटले ह्या गूढ गगनात ||

निसर्गाच्या ह्या लिलेपुढे कर माझे जुळतात |
कोण जाणे काय आले ह्या घनांच्या मनात ||

-ॐकार

Link to my English writings. Click here.

Wednesday 28 August 2013

रोहिणी

राखून काही क्षण हाती, न्याहाळता ह्या अंबरासी;
सजलेली दिसते चंद्र ताऱ्यांची मैफिल गगनाच्या उंबर्‍याशी।

असंख्य आहेत चांदण्या, त्या चंद्राच्या अंगणी;
पण चंद्राला भावणारी एकच ती ही रोहिणी।

भाबड्या त्या रोहिणीला स्वतःची ओळखही नसे;
जगी बोलतात सारे, ती तर चंद्राच्या जवळच वसे।

सावली म्हणावे का हिला चंद्राची? हा प्रश्न सुटत नाही;
अमावस्येच्या राञी मग ही वेडी कोणाची वाट पाही?

पौर्णिमेच्या राञी चंद्रासह ही हसे;
रूसता चंद्र विवंचनेत ही, त्याला समजवावे कसे?

भाग्यवान तो चंद्र ज्याच्या आयुष्यात अशी ही रोहिणी;
आसमंतात सार्‍यानाच वाटतो ह्या चंद्राचा हेवा क्षणोक्षणी।

-ॐकार


Link to my English writings. Click here.